कॉंग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन…

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कॉंग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन…

प्रतिनिधी – लक्ष्मण राजे

मुंबई:- कॉंग्रेस तसेच सर्व सेल च्या वतीने दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅस च्या भरमसाठ वाढत्या महागाईच्या विरोधात चक्क रुग्णवाहिका हातगाडी वर असा देखावा करत काँग्रेस कार्यकर्ता हातगाडी वर सलायन ची बाटली धरून निषेध केला तर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल थाटून भाकऱ्या शेकल्या.आणि केंद्रातील मोदी सरकारचा विरोध केला.मुंबई कॉग्रेस अध्यक्ष भाई जगताप, असलम शेख कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबई जिल्ह्य ब्लॉक क्रमांक 46मध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्राच्या मोदी सरकार विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करत आंदोलकांनी त्वरित इंधन दर वाढ मागे घ्या, इतर गृहउपयोगी वस्तूंचे ही दर कमी करा, अशा मागण्या केल्या. तसेच या प्रसंगी मुंबई काँग्रेस सचिव संतोष चिकणे यांनी केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा ठपका देत नरेंद्र मोदींचा राजीनामा मागितला. तसेच जर दर कमी झाले नाही तर सतत जनता जनसामान्य रस्त्यावर उतरून केंद्र सरकार ला जाब विचारणार, याचे भान सरकार ने राखावं. या प्रसंगी महासचिव डॉ. नेकसन नाटके,मेहबूब खामकर, ब्लॉक अध्यक्ष रवींद्र मोगरे, मुरगन पिल्लई,रोशन कांबळे, पूजा जवेरी,महेश धावडे,मुरुगन पिल्लई, संगीता अँटनी, संध्या नाझरे,वैशाली तांबोळी, पंकज कपूर कैलास आंबरे, सागर चेउलकर, विनय गोताड,विवेक पाडावे,दत्ता पाटील, कल्पेश मोरे,साहिल साळवी, प्रेम धोत्रे, प्रमोद भोसले,सचिन मसलकर रवी भील,जयेश पटेल, अमर ठाकोर आदी उपस्थित होते.

चौकट:आंदोलक संतप्त होऊन एसव्ही रोड वर आले होते व काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.मात्र पोलिसांनी त्वरित दखल घेत आंदोलकांना रस्त्यावरून हटवले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here