केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन्मान

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन्मान

 

सोलापूर // प्रतिनिधी

संपूर्ण भारत देशामध्ये 1 जुलै 2017 पासून वन नेशन वन टॅक्स म्हणजेच सर्व देशासाठी एकच अशी सुटसुटीत जीएसटी कर प्रणाली राबविण्यात आली या कर प्रणालीनुसार प्रत्येक महिन्याला, तिमाही, वार्षिक अशी विविध विवरणपत्रे बिनचूक व वेळेत दाखल करावी लागतात अशाप्रकारे विवरणपत्र दाखल करीत असताना शेवटचा करउपभोक्ता यांनी भरणा केलेली कराची रक्कम व उत्पादक कंपनी यांनी भरणा केलेली कराची रक्कम आणि दाखल केलेली विवरणपत्रे एकमेकाशी जुळावी लागतात अन्यथा याचा परिणाम संस्थेला मिळणाऱ्या परतावा रकमेवर होऊन विवरण पत्रा मध्ये अचूकता येणे अडचणीचे होते तथापि श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सुरुवातीपासून संगणकीकरण केले असल्यामुळे सर्वच आर्थिक व्यवहारांमध्ये अचूकता निर्माण केलेली आहे त्याचाच परिणाम म्हणून 31 मार्च 2021 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये जीएसटी द्वारे दाखल करण्यात आलेले सर्व ऑनलाइन विवरणपत्रे तसेच जीएसटी कराची रक्कम वेळेवर व बिनचूक अदा केलेली असल्याने केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय अंतर्गत केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाकडून त्यांचे अध्यक्ष एम.अजित कुमार यांनी प्रशंसनीय प्रमाणपत्र देऊन कारखान्यास सन्मानित केलेले आहे अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी , कारखान्याचे चार्टर्ड अकौटंट श्री शैलेंद्र जयस्वाल, चिफ अकौटंट रविंद्र काकडे,अकौंट विभागातील जीएसटी कर प्रणाली बाबत काम करणारा सर्व स्टाफ तसेच सर्व संचालक मंडळ यांचे अभिनंदन कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here