कृषिकन्या मानसी गोडसे हिने दिली शेतकऱ्यांना माती परीक्षणची माहिती

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

कृषिकन्या मानसी गोडसे हिने दिली शेतकऱ्यांना माती परीक्षणची माहिती

मातीचा नमुना घेऊन दाखविले प्रात्यक्षिक

 

अलीकडील काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे; म्हणून जमिनीच्या आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांमध्ये याविषयी जाणीव होणे गरजेचे आहे.यालाच अनुसरून रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या मानसी मधुकर गोडसे हिने शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी माहिती दिली.
माती परीक्षणाचा मूळ उद्देश हा जमिनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, हे तपासणे व ती भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे,हे ठरविता यावे यासाठी कृषीकन्या मानसी हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित,रत्नाई कृषी महाविद्यालय,अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी मार्गदर्शन केले. त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तिने शेतकऱ्यांना मातीचा नमुना कसा घ्यावा,कोणत्या ठीकाणाचा घ्यावा, कोणत्या ठिकाणी घेऊ नये,मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी करायचे उपाय, आवश्यक अन्नघटक व त्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे याविषयी प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले.
यावेळी कान्हापुरी गावातील प्रगतशील शेतकरी पोपट फराडे,संतोष फराडे, माजी सरपंच सोमनाथ शिंदे, शुभम फराडे, सोमनाथ शिंदे इ शेतकरी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here