ओबीसी नेत्यांना कमी लेखाल तर जशास तसे उत्तर देऊ- शरद कोळी

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

ओबीसी नेत्यांना कमी लेखाल तर जशास तसे उत्तर देऊ- शरद कोळी

 

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपुर येथे आज ओबीसी समाज व १८ पगड जातीतील प्रमुख घटकांची बैठक झाली सध्या राज्यामध्ये ओबीसी अठरापगड जाती वर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा झाली या सर्व सर्वसामान्य समाज घटकाला जागृत करून यांची एकजूट करण्याचा निर्णय यावेळेस झाला पंढरपूर हे चळवळीचं केंद्र असून येथून सुरू होणारी प्रत्येक चळवळ संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाते अनेक चळवळी पंढरपुरातून सुरुवात झाल्या राज्यभर गाजलेल्या वंचित आघाडी चा पॅटर्नही पंढरपुरात मेळावा घेऊनच झालेला होता .यावेळी बोलताना शरद कोळी म्हणाले की सध्या प्रस्थापित धनदांडगे हे गोरगरीब अठरापगड जातीतील कार्यकर्त्यावर अन्याय करीत असून गावो गाव असेच प्रकार घडत आहेत

याच प्रमाणे राज्यामध्ये काम करणाऱ्या ओबीसी नेत्यांनाही कमी लेखण्याचा व टारगेट करण्याचं काम काही प्रस्थापित लोक करीत आहेत त्यांना ताकद देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपण सर्वांनी तयार असले पाहिजे यासाठी सर्व ओबीसी अठरापगड जातीतील युवकांनी पक्ष पंथ बाजूला ठेवून एकत्र यावे सर्व ताकतीने तन-मन-धनाने मी तुमच्यासोबत आहे तुम्ही एकत्र या असे आव्हान ओबीसी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष शरद कोळी यांनी केले यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की राज्यांमधील 365 प्रस्थापित घराणी या अठरापगड जातीतील कुठल्याही कार्यकर्त्याचा विचार करत नाहीत अनेक नेत्यांना कमी लेखत आहेत आज राजकीय आरक्षण रद्द झाले उद्या शैक्षणिक नोकरीतील आरक्षण ही रद्द करतील यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे एखाद्या गरीब कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास आपण सर्वांनी तो अन्याय दूर करण्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागेल तरच न्याय मिळू शकतो प्रत्येक जातीने वेगवेगळे लढण्यापेक्षा एकत्र येऊन लढलं तर राज्यामध्ये 70 टक्के लोकसंख्या आपली आहे यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करून पंढरपूर येथे राज्याच्या राजकारणामध्ये ओबीसी घटकातील सर्व पक्षातील प्रमुख नेतेमंडळी काम करत आहेत त्यांना एकत्र आणून त्यांची एकजूट करून महामेळावा आयोजित करू या आपली ताकद या प्रस्थापितांना दाखवू या असे पुढे म्हणाले यावेळी उपस्थित शरद कोळी , माऊली हळणवर , प्रा सुभाष म्हस्के , उतम बाबा चव्हाण ,पंकज देवकते, संजय लवटे, विपुल अधटराव ,राजेंद्र बुध्याळ, नितीन काळे ,माळाप्पा खांडेकर, धनाजी बनसोडे , साधना राऊत, दत्तात्रय इंदापूरकर, अदम बागवान भाई, किशोर भोसले, अण्णासाहेब शेंडगे, बाळासाहेब वाघमोडे, दादा कोळेकर, दिनेश मेटकरी ,सोमनाथ खंडागळे ,धनाजी वाघमोडे, अंकुश हाके, लखन‌ ननवरे ,मनोज गावडे ,श्रीकांत पाटील, मुकुंद घाडगे ,पांडुरंग भेंकी, पप्पू वाघमारे, लिंगादेव म्हमाणे ,रामचंद्र केसकर, सोमनाथ खंडागळे,याचे सह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here