आ. समाधानदादा आवताडे यांच्या अटकेच्या निषेर्धात पंढरपूरमध्ये आंदोलन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आ. समाधानदादा आवताडे यांच्या अटकेच्या निषेर्धात पंढरपूरमध्ये आंदोलन

महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याच दहन

सोलापूर // प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सोलापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.या मोर्चासाठी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह जात असताना पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांना पोलीसांनी अटक केल्यानंतर त्याचे पडसाद पंढरपूर शहरात उमटलेले दिसून आले.

आमदार समाधानदादा आवताडेंच्या अटकेचे वृत्त पंढरपूरातील त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना समजताच पंढरपूरातील छत्रपती शिवाजी चौक येथे महाविकास आघाडीच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.याप्रसंगी कायदेशीर मार्गाने मोर्चा काढण्याचा व आपल्या हक्क अधिकारासाठी लढणार्‍या आमदार समाधानदादा आवताडे यांना अटक करुन महाविकास आघाडीने जे दडपशाहीचे धोरण राबवले त्याचा तिव्र शब्दात निषेध केला.

याप्रसंगी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन सरकारच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड शहरअध्यक्ष लखनराज थिटे भैय्या कळसे बंटी भोसले अमोल धोत्रे,परशुराम पवार,नवनाथ शिंदे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here