‘अशी ही बनवाबनवी’मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

‘अशी ही बनवाबनवी’मधील शंतनू मानेने अचानक घेतला जगाचा निरोप

१९८८ साली रिलीज झालेला चित्रपट अशी ही बनवा बनवी प्रदर्शित झाला. त्यावेळी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज या चित्रपटाला ३३ वर्षे उलटलेली असतानाही आजही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. अगदी अशोक सराफ यांच्यापासून ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्यापासून अश्विनी भावेंपर्यंत सगळ्यांनीच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आणखीन एका व्यक्तीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. हे पात्र म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर शंतनू माने. अशोक सराफ यांच्या म्हणजेच धनंजय मानेच्या भावाची म्हणजेच शंतनूची भूमिका साकारली होती अभिनेता सिद्धार्थ रेने.

सिद्धार्थ रे याने १९७७ मध्ये रिलीज झालेल्या ‘चानी’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. १९८० साली रिलीज झालेल्या ‘थोडीशी बेवफाई’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. या चित्रपटात त्याला पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याने ९० च्या दशकात काही हिंदी सिनेमात अभिनय केला.

‘पनाह’, ‘तिलक’, ‘गंगा का वचन’ यासारख्या चित्रपटात त्याने काम केले. मात्र मनी रत्नम यांच्या ‘वंश’ चित्रपटात त्याला विशेष भूमिका मिळाली. त्यानंतर तो प्रेक्षकांच्या खरा लक्षात राहिला तो ‘बाजीगर’ चित्रपटामुळे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. त्याने शाहरुख खानसोबत सहाय्यक कलाकाराची भूमिका केली होती.

सिद्धार्थ रेने १९९९ मध्ये लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रिया हिच्यासोबत विवाह केला होता. शांतिप्रिया हिने अनेक तामिळ आणि हिंदी सिनेमात काम केले आहे. अक्षय कुमारचा सौगंध या पहिल्याच चित्रपटात शांतीप्रिया अभिनेत्री होती. ती साऊथची लोकप्रिय अभिनेत्री भानुप्रिया हिची छोटी बहीण आहे.

लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असतील आणि अचानक ८ मार्च २००४ रोजी वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले असून मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव शिष्या आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शांतिप्रियाने चित्रपटात काम करणे कमी केले होते. मात्र आता काही काळ उलटल्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या सेकंड इनिंगला सुरुवात केली आहे. आता ती हिंदी मालिंकमध्ये काम करते आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here