अनुप मंडळ वर तात्काळ बंदी साठी स्वतः प्रयत्न करणारः देवेंद्र फडणवीस

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

अनुप मंडळ वर तात्काळ बंदी साठी स्वतः प्रयत्न करणारः देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय जैन संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

 

सोलापूर // प्रतिनिधी 

अनुप मंडळाच्या देश द्रोही व धर्म विरोधी कारवाया अजिबात सहन केल्या जाऊ शकत नाहीत. जैन धर्म आणि हिंदू धर्मा संदर्भात चालत असलेल्या अपप्रचार तात्काळ थांबणे आवश्यक आहे, यासाठी या राष्ट्रदोही संघठन वर देशभरात बंदी घालण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन असे आश्‍वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राष्ट्रीय जैन संघठनेच्या शिष्टमंडळास दिले, ते पुढे म्हणाले की ह्या कामासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जैन समाजाच्या शिष्टमंडळाच्या समवेत भेट घेऊन आपण तातडीने पुढील कारवाई करण्यास त्यांना विनंती करू.
राष्ट्रीय जैन संघठनेने संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांच्या मार्फत 500 हून अधिक ठिकाणी निवेदन देण्याचे आंदोलन केले होते त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रा मध्ये जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी ललित गांधी यांच्या नेतृत्वात आमदार मंगलप्रभात लोढा व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या शिष्टमंडळात संदीप भंडारी डी.सी सोळंकी, महेंद्र जैन, रिषभ मारू आदी जैन समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदन प्रस्तुतीकरणाच्या राष्ट्रीय आंदोलनाला संपूर्ण भारतात चांगला प्रतिसाद मिळाला असून
नागालैंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपुर, मेघालय, यासारखी पूर्वोत्तर राज्ये, केरळ, गोवा सारखी दक्षिणी राज्ये ,तसेच जम्मू कश्मीर, उड़ीसा असे जैन समाजाची कमी संख्या असलेल्या राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, झारखंड, बिहार अशा बहुसंख्याक जैन समाज असलेल्या राज्यांमध्ये सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत एकून 529 ठिकाणी निवेदन देण्यात आलेली आहेत. आणि हा क्रम यापुढेही 30 जून पर्यंत असाच चालू राहणार आहे अशी माहितीही राष्ट्रीय जैन संघठनेचे समन्वयक ललित गांधी व अतुल शहा यांनी दिली.

फोटो कॅप्शन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा करताना राष्ट्रीय जैन संघठनेचे ललित गांधी सोबत आमदार मंगलप्रभात लोढा, संदीप भंडारी व अन्य जैन समाजाचे पदाधिकारी.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here